अंगणवाडी केंद्रांवर पोषण आहाराच्या नावाखाली गोमांस

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात गोमांस बंदीची लाट भाजपनेच आणली होती. मात्र भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये अंगणवाडी केंद्रांवर पोषणाच्या नावाखाली हवाबंद पाकिटांमधील अन्न वाटलं गेलं. मुलांनी घरी जाऊन पाकिट उघडली तेव्हा यात गोमांस, चिकन आणि पोर्क आढळलं. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्राने यासबंधी बातमी दिली आहे.

ही अन्नाची पाकिटं गेल्या आठवड्यात अंगणवाडी केंद्रांवर वाटली गेली होती. ५५ मुलांच्या पालकांनी गोमांस निघाल्याची तक्रार उधमसिंह नगरच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये केली आहे. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक बालविकास केंद्राच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, अंगणवाडी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी गोमांस असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, या पाकिटांमध्ये ओट्स आणि सोयाबीनपासून बनवलेले  खाद्यपदार्थ होते.

1 Comment

Click here to post a comment