अमरसिंह पंडित यांच्या विरुद्ध खंडणीची तक्रार देणारा अधिकारी निलंबित

टीम महाराष्ट्र देशा : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाली होती. बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती . पंडित यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकी दिल्याचे तर पंडित यांनी खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. नरहरी शेळके यांनी केला आहे.

दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. त्यांच्यासोबत कारकूनही एसीबीच्या जाळ्यात अडकला. शेळके एक लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. 2008 मध्येही शेळकेंची लाचलुचपत खात्याकडून चौकशी झाली होती.

औरंगाबाद शहरात एन 1 भागात नरहरी शेळके यांचा बंगला आहे. त्याची किंमत 2 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. घरात 1.2 किलो चांदी, 22 ग्रॅम सोनं, एक बँक लॉकर आणि 16 लाखांचे एफडी मिळाल्या आहेत.

जनसामान्यातील माझी प्रतिमा डागाळण्याचा हा कुटील डाव आहे, शेळकेंचा बोलविता धनी कोण?, असा सवाल अमरसिंह पंडित उपस्थित केला. या प्रकरणात दोषी आढळल्यास राजकीय जीवनातून संन्यास घेईल, अस अमरसिंह पंडित यांनी स्पष्ट केलं होत.

धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून ‘सदस्यांनी जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत काय? अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी आली आहे? असे सवाल उपस्थित केले. आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करणाऱ्या शेळके यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली.

काय आहे प्रकरण

‘बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा’ असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तीने जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांच्याकडे पोहचवला होता.

पंडित यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकी दिल्याचे तर पंडित यांनी खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. नरहरी शेळके यांनी केला होता.

You might also like
Comments
Loading...