fbpx

रेल्वे तर मीच चालवणार, मनोरुग्ण तरुणाने घेतला थेट इंजिनचा ताबा

टीम महाराष्ट्र देशा :एका मनोरुग्ण तरुणाने रेल्वे चालवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बीड रेल्वे स्थानकावरील ही घटना असून, परळी-अकोला एक्स्प्रेस रेल्वे चालवण्याचा प्रयत्न त्या मनोरुग्ण तरुणाने केला आहे.

बीड रेल्वे स्थानकावर परळी-अकोला एक्स्प्रेस रेल्वे थांबलेली असताना, एक मनोरुग्ण तरुण थेट इंजिनच्या केबीनमध्ये जाऊन बसला आणि रेल्वे चालवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रेल्वे चालकाने त्या तरुणाला खाली उतरण्यास सांगितलं असता तरुणाने खाली उतरण्यास नकार देत मीच रेल्वे चालवणार असे विधान केले . दरम्यान रेल्वे चालकाने रेल्वे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी त्या तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मनोरुग्ण तरुण खाली उतरण्यास तयार नव्हता. तब्बल अर्धा तास तो मनोरुग्ण तरुण इंजिनच्या केबीनमध्ये बसून राहिला. पोलिसांच्या प्रयत्नानंतर अर्ध्या तासानंतर मनोरुग्ण तरुणाला बाहेर काढण्यात आले.

दरम्यान परवानगी नसताना एखादी व्यक्ती इंजिनच्या केबीनमध्ये जाऊच कसा शकतो? रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्या मनोरुग्ण तरुणाने इंजिनच्या उपकरणांशी छेड केली असती आणि इंजिन रेल्वे स्थानक सोडून बाहेर गेले असते तर काय झाले असते, असे अनेक प्रश्न या घटने भोवती उपस्थित होतात.