धनंजय मुंडे की पंकजा मुंडे , परळीचा गड कोण जिंकणार ?

टीम महाराष्ट्र देशा :- राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहे. यामध्ये काही लक्षवेधी लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

या मतदार संघातून महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे आणि महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आमने सामने आहेत. यामुळे या भाव – बहिणीच्या लढाईत कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान , राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या पंकजा मुंढे यांनी 96 हजार 904 एवढी मते घेत विजय मिळवला. परळी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस चे धनंजय मुंडे होते.

महत्वाच्या बातम्या