उस्मानाबाद –लातूर- बीड विधानपरिषदेचा आज निकाल

बीड: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीचा लांबणीवर पडलेला निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश दिल्याने आता आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

You might also like
Comments
Loading...