fbpx

तरी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना टोला!

pankaja munde and dhananjay munde

मुंबई : “पक्षाचा अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे,” असा कणखर टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना नाव न घेता लगावला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ”बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली, राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे,”

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी चांगलीच तोंडघशी पडली आहे.

”बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत, राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो आणि अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचंच फलित म्हणजे सुरेश धस आमच्याबरोबर आहेत,” असंही त्या म्हणाल्या.

1 Comment

Click here to post a comment