बीड; मार्केट बंद, मात्र नागरिकांचा संचार सुरूच!

बीड: जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या उपाय योजना फेल होताना दिसत आहे. दहा दिवस लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असतानाही आकडेवारी हादरवून टाकत आहे. पॉझिटिव्हची वाढती संख्या चिंताजनक असून जिल्हाधिकारी यांनी सोमवारी काढलेल्या आदेशाप्रमाणे मार्केट बंद राहिले. परंतु लोकांची मानसिकता निगेटिव्ह बनत आहे. मार्केट बंद असतानाही लोकं रस्त्यावर दिसून आले. एकूणच परिस्थीती हाताबाहेर जात असताना नागरिकांनी जबाबदारीचे भान पाळणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची लाट आली असून गतवर्षीपेक्षा अधिक पटीने कोरोनाचे रूग्ण सापडू लागलेले आहेत. रोज १०० रूग्णांच्यावर रूग्णसंख्येत वाढ होत असून मंगळवारी सर्वाधिक संख्या झालेली आहे. जिल्ह्यात ७१६ रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सोमवारपर्यंत ६६२ रूग्णांचा मृत्यू झालेला होता. तर यात मंगळवारी ८ रूग्णांची भर पडलेली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट आता १० टक्क्यावर जाऊन पोहचलेला आहे. तर मृत्यू दरही २.३९ टक्के आहे. या आठवड्यात मृत्यूंची संख्या वाढलेली आहे.

आजवर ४ लाख ५२ हजार लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेस्ड झालेले आहेत. प्रशासन कितीही मेहनत करत असले तरी कोरोनाची साखळी तुटण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी यांनी सोमवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर मंगळवारी काही ठिकाणी अर्धशटर उघडे ठेवून दुकाने सुरू होती. दुपार नंतर ही दुकाने बंद दिसली. मार्केट बंद असले तरी रस्त्यावर मात्र नेहमी प्रमाणे लोक फिरताना दिसून आली. यामुळे दुकाने बंद ठेवली तरी काही उपयोग होताना दिसत नाही.

महत्वाच्या बातम्या