बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून अनेक उमेदवार निश्चित करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस कामाला लागले आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यादृष्टीने क्षीरसागर यांची तयारी चालू झाली असल्याचे कळते आहे.

दुसऱ्या बाजूला बीडच्या विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

bagdure

आजघडीला पक्षासोबत असलेले जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. क्षीरसागर यांना उमेदवारी दिली तर ते नक्की निवडून येतील अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. मागील एक वर्षापासून लोकसभेची बांधणी सुरु असल्याचे कळते आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना तिकीट मिळणार म्हणून कार्यकर्ते कमाल लागले आहेत.

त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध आमदार जयदत्त क्षीरसागर असा सामाना रंगण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध क्षीरसागर अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

You might also like
Comments
Loading...