बीड लोकसभेला धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे?

बीड : लोकसभेला धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे असा बहिण-भाऊ सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपकडून बीड लोकसभेला विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचा उमेदवारीचा तिढा काही सुटता सुटेना. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा चालू असल्याचे कळते आहे. त्यामुळे बीड लोकसभेला धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड लोकसभेला मतदार संघात विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना तोडीस तोड उमेदार द्यायचा म्हणाल्यास तसाच तगडा उमेदवार हवा आहे. त्यामुळे इथे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून लोकसभेला विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, विधानसभा आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा चालू असल्याचे कळते आहे. त्यामुळे बीड लोकसभेला राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही अनुउत्तरीतच आहे.

Loading...

परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कामगिरीमुळे त्यांना माणनारा वर्ग जिल्ह्यात वाढला आहे . पक्षाच्या मूळ मतदारांसह ते त्यांच्या समाजाची काही मते घेऊ शकतील असे अंदाज वरिष्ठ पातळीवरून बांधले जात आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सुद्धा पक्षाकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. याबबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतील यावर सगळे अवलंबून आहे.

तसे पाहता धनंजय मुंडे यांना लोकसभेपेक्षा परळी विधानसभेत अधिक रस आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे लोकसभेला उभा राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. परंतु शरद पवार यांचा आदेश असल्यास मुंडे यांच्यासमोर पर्याय नसणार आहे. बीड लोकसभेला धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले तर धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे असा बहिण-भाऊ सामना असणार आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

त्यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्हाभर असलेले कार्यकर्त्यांचे जाळे कायम आहे. तेही लोकसभेला इच्छुक असल्याचे कळते आहे. आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने ते लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल