fbpx

बीड लोकसभा : राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित फायनल?

टीम महाराष्ट्र देशा – बीड लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभेला राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित फायनल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने ते लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमरसिंह पंडित यांच्या नावावर सहमती दर्शवली असल्याचे माहिती मिळाली आहे.

या मतदार संघात विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या तोडीस तोड उमेदावार द्यायचा म्हणाल्यास तसाच तगडा उमेदवार हवा आहे. त्यामुळे बीड लोकसभेला राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही अनुउत्तरीतच होता. परंतु मिळालेल्या माहिती नुसार अमरसिंह पंडित फायनल झाले आहेत.

त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामाना रंगणार आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध पंडित अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.