बीड: स्वच्छतागृह नसल्याने सरपंच अपात्र

blank

टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छतागृह नसल्याने महिला सरपंचाचे सदस्यत्व आणि तिसऱ्या अपत्यामुळे दुसऱ्या एका महिला सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला. चिंचखंडी येथील संगीता नवनाथ होके या सरपंचपद, कोळगाव थडी येथील सिंधू गोविंद तौर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले.

चिंचखंडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ता. ६ ऑक्टोबर २०१७ला झाली होती, त्यात सविता होके व संगीता होके यांच्यात लढत होऊन संगीता होके या सरपंच म्हणून निवडून आल्या. निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी सविता होके यांनी, संगीता होके यांच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकारी यांच्याकडे आक्षेप दाखल करत संगीता या ज्या घरात राहतात त्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचा आक्षेप घेतला होता. मात्र, सदर आक्षेप फेटाळल्यानंतर सविता होके यांनी संगीता होके यांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.

उच्च न्यायालयाने अर्जदारास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे सुचविले. त्यानुसार अर्जदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. त्याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे झाली असता, सरपंच या अभिमान होके यांच्याकडे किरायाने राहत असून त्या ठिकाणी संयुक्त शौचालय वापरत असल्याचे व सरपंच संगीता होके यांच्याकडे स्वतंत्र शौचालय नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे अर्जदार सविता होके यांचे अपील मंजूर करून सरपंच संगीता नवनाथ होके यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला.

तर कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत सदस्य सिंधू तौर यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्याची याचिका अशोक तौर यांनी केली होती. उमेदवारी अर्जात सिंधू तौर यांनी दोनच अपत्यांचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांचे तिसरे अपत्यही २००१नंतर जन्मल्याचे सिद्ध झाल्याने सिंधू तौर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :