fbpx

भाजप-सेनेच्या युतीमुळे बीडमधून राष्ट्रावादी हद्दपार होण्याच्या मार्गावर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात देखील आघाडी आणि युतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात या विधानसभेला हाय व्होल्टेज लढत पहिला मिळणार आहे. बीड जिल्ह्यात २०१४च्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र पक्षाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अंतर्गत कलहांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीला देखील बीड जिल्ह्यात भाजप युतीचे वर्चस्व असणार असल्याचं दिसत आहे.

बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा ठरला आहे. कारण या मतदारसंघात मुंडे बंधू भगिनी आमने सामने येणार आहेत. भाजप युतीकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी असणार आहे तर त्यांच्या विरोधात आघाडी कडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या मतदार संघाबाबत तर्क वितर्क लावणे कठीण आहे. मात्र २०१४चा निवडणुकीमध्ये भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला होता. तर पंकजा मुंडे या २५८९५ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे भाजप या जागेवर पुन्हा विजय संपादन करणार कां ? हे पहाणे औत्सुक्याच ठरणार आहे.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची काहीअंशी ताकद कमी झाल्याच दिसत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे क्षीरसागर यांच्या शिवसेनेत येण्याने भाजप युतीची ताकद काही अंशी वाढली आहे. या मतदार संघात युतीकडून जयदत्त क्षीरसागर आणि आघाडीकडून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी देणार असल्याच चर्चेत आहे. त्यामुळे बीड विधनासभा मतदारसंघात यंदा काका-पुतण्या असं राजकीय वॉर पाहिला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपला घवघवीत यश मिळाल आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक मतदारसंघातूनच डॉ. प्रीतम मुंडे यांना लीड मिळाल आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातून भाजपला ६ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली. तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असणाऱ्या केजमधूनही भाजपला २८ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेवराईतही शिवसेनेचे बदामराव पंडित आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या एकीमुळे भाजला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वामुळे बीड जिल्ह्यातून राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाची पीछेहाट झाली आहे.