बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले

blank

टीम महाराष्ट्र देशा – बीड मधील रोहतवाडीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. आपण भाजपच काम केलं म्हणून आपल्याला मारहाण झाली असल्याच सरपंच पांडुरंग नागरगोजे याचं म्हणन आहे. तसेच पाटोदा पोलीस ठ्न्यात त्यांनी तशी तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरगोजे यांनी फेसबुक वर धनंजय मुंढे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह्य पोस्ट केली असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच म्हणन आहे.पोलीस चौकशी करत असून त्यानंतरच सत्य काय ते बाहेर येईल.

बीडमध्ये विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंढे यांनी पंकजा मुंढे यांचा पराभव केला . तेव्हापासून बीडच्या राजकारणात मुंढे विरुद्ध मुंढे संघर्ष बघायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळातही नेत्यांमधला असलेला संघर्ष कार्यकर्त्यामध्ये होणं थांबेल, अशी काही चिन्ह दिसत नाही.