धनंजय मुंडेंना धक्का, बीड – लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूकीत सुरेश धस विजयी

उस्मानाबाद: बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक पहिल्यापासूनच चुरशीची राहिली होती. सर्वप्रथम अधिकृत उमेदवार कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला होता. त्यानंतर आता धस यांच्या विजयाने विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे आणि धस यांनी धोबीपछाड दिल्याचं बोललं जातं आहे. मताची आकडेवारी कमी असताना देखील काँग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. दरम्यान धस यांना 526 मत, जगदाळे यांना 452 , 1 मत नोटाला  तर 25 मते  बाद झालीयेत.