हिंगोली : आमदार, खासदार होणे सोपे आहे, मात्र ग्रामपंचायत सदस्य होणे म्हणजे पीएचडी करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हिंगोली येथे केली. जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर सडकून टिका घेतली.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणी कोणत्या खुर्चीवर बसावे असा वाद सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने त्यांच्या काळात महाराष्ट्राला दुषित पाणीपुरवठा केला होता. नंतर राज्यात भाजपचे सरकार अल्यानंतर वॉटरगील्ड प्रकल्प राबवला. मात्र महाविकास आघाडीने या प्रकल्पाला स्थगिती दिली. हे आघाडी सरकार नसून स्थगिती सरकार आहे अशी खोचक टीका यावेळी लोणीकर यांनी केली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करुन त्याच्या कडून सक्तीने वसुली सरकार करत आहे. याबद्दल लोणीकरानी नाराजी दर्शवली.
या सरकारमधील अनेक मंत्र्यावर बलात्काराचे आरोप होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे हे सरकार लवकरच संपुष्टात येईल. सरकारच्या पापाचा घडा लवकरच भरेल आणि हे सरकार पडेल व राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, आसा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- राजेश टोपेंचे पत्राद्वारे जनतेला कळकळीचे आवाहन; म्हणाले…
- ‘अमिताभ, अक्षय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण रोखून दाखवाच – गिरीश महाजन
- ‘यही है अच्छे दिन?’, इंधन दरवाढीवरून मुंबईत युवा सेनेची मोदीं विरोधात पोस्टरबाजी
- फाशी दिली जाणाऱ्या शबनमने साधला मुलाशी हृदय पिळवटून टाकणारा संवाद
- इंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस