भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही !

टीम महाराष्ट्र देशा : शासनाला भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने शासनाने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही, जर गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता. असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?

दरम्यान , भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे . कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेनं ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारनं समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.

एकीकडे शनी शिंगणापूर देवस्थान माजी आमदार शंकर गडाख यांच्या ताब्यात असल्याने भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आक्षेप असल्याची चर्चा सध्या नेवासा तालुक्यात रंगली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील राजकारणात देव, देवतांनाही ओढल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.