‘यामुळे’ वरुण चक्रवर्ती गेला होता बायोबबलच्या बाहेर, खरे कारण आले पुढे

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. सोमवारी ३ मे रोजी आयपीएलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या मुख्य खेळाडुमध्ये वरुण चक्रवर्तीचा समावेश आहे. मात्र कोरोनाचे नियम इतके काटोकोरपणे आयपीएलमध्ये पाळले जात असताना वरुण बायोबबलमधून बाहेर का गेला. हा प्रश्न केकेआरच्या चाहत्यांना पडला होता. सोमवारी उशीरा याचे खरे कारण समोर आले आहे. वरुण हा त्याच्या खांद्याचे स्कॅन करण्यासाठी अधिकृत ग्रीन चॅनेलद्वारे बायो बबल बाहेर गेला होता. अशी माहिती मिळाली आहे. या दरम्यानच वरुणला कोरोनाची लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, खेळाडूंना खासगी वाहनातून पीपीई किट घालून रुग्णालयात जाण्याची परवानगी आहे. यावेळी खेळाडूवर उपचार घेण्यासाठी येणारे वैद्यकीय कर्मचारीसुद्धा पीपीई किट परिधान करतात. वरुणने या नियमाचे काटेकोरपणे पालन केले होते. मात्र तरीदेखील प्रोटोकॉलच्या आत खेळाडूला कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे.

महत्वाच्या बातम्या