Share

Pathaan | ‘या’ कारणामुळे शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’वर प्रेक्षक संतप्त

Pathaan | मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष अत्यंत वाईट ठरलं आहे. कारण या वर्षांमध्ये प्रेक्षकांनी अनेक मोठे चित्रपट बॉयकॉट केले आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कमाई करू शकले नाही. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाला प्रेक्षक बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे.

‘पठाण’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या गाण्याने प्रदर्शित होतात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं अनेकांना आवडलं आहे, तर अनेक प्रेक्षक या गाण्यावर टीका करताना दिसत आहे. दरम्यान, या गाण्यामुळे ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी अनेक प्रेक्षक करत आहे.

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाणं पाहिल्यानंतर या चित्रपटाला विरोध होऊ लागला आहे. कारण या गाण्यांमध्ये दीपिका आणि शाहरुख यांचा बोल्ड डान्स आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘बॉयकॉट पठाण’ हॅशटॅग सुरू केला आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यातून अश्लीलतेचे प्रदर्शन केलं जात असल्याचं अनेक नेटकऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळे आता दीपिका आणि शाहरुखच्या या चित्रपटाला बहिष्कारला सामोरे जावे लागणार आहे. दीपिका आणि शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Pathaan | मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष अत्यंत वाईट ठरलं आहे. कारण या वर्षांमध्ये प्रेक्षकांनी अनेक मोठे चित्रपट बॉयकॉट …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now