fbpx

संबित पात्रांच्या स्नेह भोजन कार्यक्रमामुळे उज्ज्वला योजनेची पोलखोल

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप कडून प्रचार सभांमध्ये गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांच्या पावत्या दिल्या जात आहेत. तर आमच्या योजना देशातील सर्व घरात पोहोचल्याच्या देखील दावा केला जात आहे. मात्र आता भाजपच्या एका नेत्यामुळे भाजपच्या योजना घरा घरात नक्की पोहोचल्यात का याची पोलखोल झाली आहे. भाजप नेते संबित पात्रा यांच्या स्नेह भोजनाच्या एका व्हिडीओ ट्विटमुळे भाजपची उज्ज्वला योजना चर्चेत आली आहे. या व्हिडीओत संबित पात्रा एका गरीब कुटुंबाच्या घरी जेवताना दिसत आहेत. मात्र त्या घरातील महिला हे जेवण चुलीवर बनवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहेत.

आज संबित पात्रा यांनी ओडीसा येथील एका गरीब कुटुंबाच्या घरी जेवण घेतले. यावेळी त्या घरातील गृहिणी संबित पात्रा यांच्यासाठी जेवण चुलीवर बनवत होती. त्यामुळे भाजप नेते प्रचार सभांमधून एवढ्या आत्मविश्वासाने उज्ज्वला योजनेचा डंका पिटत आहेत मात्र दुसरीकडे भाजप नेतेच चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यामुळे मोदींची उज्ज्वला योजना नक्की घरा घरात पोहचली का असा सवाल येथे उपस्थित होत आहे.

दरम्यान या ट्विटमध्ये संबित पात्रा यांनी काही मजकूर लिहिला आहे. ते म्हणतात की , यह मेरा अपना परिवार है, माँ ने खाना बनाकर खिलाया। मैंने अपने हाथों से इन्हें खाना खिलाया और मैं यह मानता हूँ कि इनकी सेवा ही ईश्वर की सबसे बड़ी पूजा है।

1 Comment

Click here to post a comment