वाढत्या लोकप्रियतेमुळेच माझ्यावर हल्ला – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – ‘माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही लोक माझा दु:स्वास करत आहेत. त्यामुळेच या लोकांनी माझ्यावर हल्ला केला असावा,’ अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. त्यासोबत पोलिसांनी पुरेशी सुरक्षा न दिल्यानेच असा प्रकार घडल्याचा आरोपही आठवले यांनी केला असून याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यादरम्यान, आठवले यांना धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

आठवलेंवर हल्ला करणारा प्रवीण गोसावी नेमका आहे तरी कोण ?

You might also like
Comments
Loading...