कोळसे पाटलांच्या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीमध्ये तू तू-मै मै ?

टीम महाराष्ट्र देशा – भाजपविरोधात एल्गार पुकारलेल्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये असणारे वाद आता चव्हाट्यावर आले आहेत . वंचित बहुजन आघाडीमध्ये शीतयुद्ध सुरु झालं असून याची पहिली ठिणगी औरंगाबादमध्ये  पडली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आघाडीने घोषित केलेले उमेदवार माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांना विरोध करत एमआयएमने खदखद व्यक्त केली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यापद्धतीने कोळसे पाटलांनी तशी तयारी देखील सुरु केली असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याचवेळी एमआयएमनेही औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची पडद्यामागून तयारी सुरु केली आहे.

नुकतीच एमआयएमच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली आणि त्यात औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली.कोळसे पाटील यांचं काम हे पुण्यामध्ये आहे.औरंगाबादमध्ये उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये निराशा येईल. त्यामुळे एमआयएम औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील एका जागेवर उमेदवारी देणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे. तरीही याबाबतचा अंतिम निर्णय ओवेसी आणि आंबेडकर घेतील असं देखील जलील यांनी म्हटलं आहे.

1 Comment

Click here to post a comment