‘कोल्हापूर – सांगलीतं आलेल्या महापुरामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात’

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगलीत आलेल्या महापुरामुळे राज्यात येत्या काही दिवसात होणारी विधानसभा निवडणुक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे. चार दिवसांनी सरकारला जाग आली आहे. यात्रा आणि पक्षप्रवेशामधून त्यांना वेळ नाही. भाजपला जनतेशी काही देणं घेणं नाही. भाजप काय, शिवसेना काय, दोन्ही पक्ष राजकारण करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान कोल्हापूर – सांगलीतील पूरस्थिती अजूनही कायम आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरूचं आहे. अनेक नागरिक अजूनही पाण्यात अडकले आहेत. अशा विदारक परिस्थितीत जनतेच्या आणि ढेपाळलेल्या प्रशासनाच्या मदतीला सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. तर लष्करी पथकं देखील पूरग्रस्तांची मदत करत आहेत. या महापूरामुळे आपत्ती व्यवस्थापन खात्याचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पूरग्रस्त भागात २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख 

‘असते एक-एकाचे नशीब… कधी डक वर्थ लुईस मदतीला येतो तर कधी ईव्हीएम’

महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई