‘आयपीएलमुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू भारतीयांचे..’; ‘या’ खेळाडुची जीभ घसरली

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान लॉर्डस येथे पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. हा सामना इंग्लंडच्या संघाने यशस्वीपणे अनिर्णीत राखला. मात्र या सामन्यात पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सनच्या जुन्या व्हायरल ट्विटमुळे त्याला निलंबीत करण्यात आले.

या प्रकरणात भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनीयर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘इंग्लंडमधील खेळाडु आणि नागरीक हे वर्णद्वेषी आहेत. मात्र आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशामुळे भारताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला. आयपीएल पुर्वी त्यांचा बघण्याचा दृष्टिकोण काय होता. हे माझ्यासारख्या जुन्या खेळाडूना माहीत आहे. आयपीएलमुळे हे भारतात क्रिकेट खेळण्यासाठी, प्रशिक्षक किंवा समालोचक म्हणून येतात आणि पैसे कमावतात.’

यावेळी बोलताना फारुख इंजिनीयर यांनी त्याना स्वत:ला वांशीक टिप्पणीचा सामना करावा लागल्याची माहिती त्यांनी दिली. काउंटी क्रिकटमध्ये लॅकोशायर संघाकडुन खेळताना त्यांना अनेकदा भारतीय म्हणून अनेक जण त्यांच्यासमोर वांशिक टिप्पण्या करत असायचे. फारुख इंजिनीयर हे इंग्लंडमध्येच स्थायिक झालेले आहे. यादरम्यान ओली रॉबिन्सनच्या निलंबनानंतर अनेक इंग्लंड खेळाडुंनी स्वत:च्या सोशल मीडीयावरील अक्षेपार्ह जुने ट्विट हटवायला सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP