सोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका करणं तरुणाला पडलं महागात

पुणे : सोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. टीका केल्यानंतर या तरुणानं माफी मागितल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी त्याला ५० उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुण्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचली. यावेळी मनसैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या.