Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Beauty Tips | टीम कृषीनामा: टोमॅटो (Tomato) चा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. टोमॅटो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर टोमॅटो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहज दूर करतात. त्याचबरोबर टोमॅटोच्या मदतीने त्वचेचा रंग सुधारू शकतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने टोमॅटोचा वापर करू शकतात.

टोमॅटोचा रस (Tomato juice-Beauty Tips)

चमकदार त्वचेसाठी तुम्ही टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकतात. यासाठी तुम्हाला कापसाच्या मदतीने टोमॅटोचा रस संपूर्ण चेहऱ्यावर लावावा लागेल. टोमॅटोच्या रसाने तुम्हाला चेहऱ्यावर पाच मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला टोमॅटोचा रस दहा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. चमकदार आणि मऊ त्वचेसाठी तुम्ही दररोज चेहऱ्याला टोमॅटोचा रस लावू शकतात. नियमित टोमॅटोचा रस लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाचे उत्पादन कमी होते.

टोमॅटो आणि बेसन (Tomatoes and besan-Beauty Tips)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि बेसनाचे मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळून घ्यावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये लिंबाचा रस देखील मिसळू शकतात. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.

टोमॅटो आणि चंदन (Tomatoes and sandalwood-Beauty Tips)

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही टोमॅटोसोबत चंदनाचा वापर करू शकतात. चंदनामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. तुम्हाला चार चमचे टोमॅटो रसामध्ये दोन चमचे चंदन पावडर मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

टोमॅटो आणि दही (Tomatoes and yogurt-Beauty Tips)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोमॅटोमध्ये दही मिसळू शकतात. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळून येते, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे टोमॅटोच्या रसामध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. ही पेस्ट व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याने चेहऱ्यावर काही मिनिटे मसाज करावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

टोमॅटो आणि कोरफड (Tomatoes and Aloevera-Beauty Tips)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि टोमॅटो मिक्स करून चेहऱ्याला लावू शकतो. कोरफडीमध्ये अँटिस्पेक्टिक आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर करतात. तुम्हाला एक चमचा टोमॅटो पल्पमध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून तुम्हाला हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे