फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड

का करतायत पुणेकर या रस्त्यावर गर्दी

संदीप कापडे : निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर म्हणजे पुणे, मात्र. गेल्या काही वर्ष्यात वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हिरवळ कमी होते आहे.  पण सध्या स्मार्ट सिटी आणि इतर योजनाअंतर्गत शहराची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे पुणे शहराच ह्र्दय असणारा जंगली महाराज रस्ता.

सध्या स्वच्छ पुणे, सुंदर पुणे ही संकल्पना जंगली महाराज रोड वर खरी उतरत आहे. संभाजी महाराज  उद्याना जवळ या रस्त्याच  नुकतंच सुशोभिकरण करण्यात आल आहे.  पाऊसाला सुरवात झाल्यामुळे सुशोभिकरण आणखीनच उठून दिसत आहे.. अगदी परदेशात आल्याचा अनुभव सध्या या ठिकाणी पुणेकरांना मिळत आहे .

bagdure

 

सीमेंटच्या जंगलात झाडांनी दाटलेला हिरवंगार परिसर म्हणून जंगली महाराज रोड आधीच कौतुकास्पद आहे. त्यात आणखी वाढ झाली ती या  सुशोभिकरणाची. त्यामुळे या ठिकाणी वेळ घालवन्यास पुणेकरांनी एकच गर्दी होत आहे.  “दिखती तो भीड है। लेकिन चलते सब अकेले है” अश्यातला अनुभव सध्या जे एम रोड वर येत आहे.  या रस्त्याप्रमाणे शहरातील आणखीन काही रस्ते सुशोभित केले जाण्याची इच्छा पुणेकर व्यक्त करत आहेत.

You might also like
Comments
Loading...