गर्भवती विवाहितेला सासरच्या लोकांकडून मारहाण; नाईलाजास्तव करावा लागला गर्भपात

औरंंगाबाद : गर्भवती विवाहितेला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली. त्यामुळे नाईलाजास्तव गर्भपात करावा लागला. हा भयंकर प्रकार सिडकोतील संभाजी कॉलनीत घडला. विवाहितेचे सप्टेंबर २०१९ मध्ये सुमीत लक्ष्मण आगळे याच्याशी लग्न झाले.

त्यानंतर ती गर्भवती असल्याचे सासरच्या मंडळींना माहिती होते. तरी देखील त्यांनी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. पतीने दांड्याने मारहाण केल्यामुळे विवाहितेच्या पोटात दुखू लागले.

त्यामुळे नाईलाजास्तव विवाहितेचा गर्भपात करावा लागला. याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलीस ठाण्यात सुमीत आगळे, लक्ष्मण जयराम आगळे, अमित लक्ष्मण आगळे आणि दोन महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या