पुण्यावरून परतलेल्या तरुणाला “तुला कोरोना झाल्या”चे म्हणत मारहाण

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील एका तरुणाला ‘तुला कोरोना झाला आहे’. असे म्हणत मारहाण करण्यात आली, हा तरुण गावातील किराणा दुकानात गेला होता त्या ठिकाणी हा प्रकार घडला.

देशात लोकडाऊन मुळे चांगलीच धास्ती पसरल्याचे दिसतेय, लोकडाऊन नंतरच्या पहिल्या तीन दिवसात अनेक ठिकाणी लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सोनवडील समीर अन्वर सय्यद हा तरुण पुण्याला कंपनीत काम करतो १० मार्च रोजी तो सोनवडीला परतला होता, समीर सय्यद गावातील एका किराणा दुकानात गेला त्या ठिकाणी त्याला एका व्यक्तीने तुला कोरोना झाला आहे. तू आमच्या गावात का आला असं म्हणत डिवचले त्यानंतर त्यांच्यात वाद वाढला व त्यांच्या मध्ये हाणामारी सुरु झाली भांडणाच्या ठिकाणी समीरचे आई, वडील, भाऊ, बहीण आले असता त्यांना देखील काठ्या लाठ्यानी मारहाण करण्यात आली यात त्यांना जबर मार लागला. तसेच मारहाण करणारे दोघे देखील जखमी झाले.

गावातील पोलीस पाटील सय्यद मेहबूब सय्यद दादा यांनी पाचोड पोलिसांना घटनेची माहिती दिली व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींचे जवाब नोंदविले.

दरम्यान कोरोनाच्या भयाने अनेक ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांना संशयाच्या नजरेने बघितले जात असल्याने लोक आपली तपासणी करण्यास टाळाटाळ करतांना दिसताय. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व रागावतील लोकांमध्ये तणाव निर्माण होऊन अशा घटना समोर येत आहेत.