टीव्ही दुकानदाराला मारहाण

औरंंगाबाद : दुकानदाराने टीव्ही देण्यास नकार देताच चौघांनी शिवीगाळ व मारहाण करत शटरच्या अँगलवर डोके आदळले. ही घटना १३ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास जालना रोडवरील अपना बाजार येथे घडली.

अनिकेत श्रेणीक शाह (वय ३२, रा. एमरॉल्ड सोसायटी, वाल्मी) हे वडिलांसह दुकानात काम करत होते. त्यावेळी दुकानात अजय चांदळणे, विजय चांदळणे (दोघेही रा. शिवशंकर कॉलनी) व त्यांच्यासोबत दोन अनोळखी गेले.

त्यांनी टीव्ही घ्यायचा असल्याचे दुकान मालक शाह यांना सांगितले. तेव्हा शाह यांनी लॉकडाऊन असल्यामुळे टीव्ही देता येणार नाही असे सांगितले. याचा राग आल्याने चांदळणे भावंडांसह अन्य दोघांनी शाह यांना मारहाण केली. त्यावरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या