पुणे- देशास ‘आरोग्य दृष्ट्या तारणहार व मार्गदर्शक’ ठरणाऱ्या ‘आयसीएमआर’ (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) कडूनच “कोरोना संसर्ग काळात प्रतिबंधक लसीं मधील वेळेचे अंतर वा प्लाझ्मा थेरपी बाबतचे धोरण,” यातील वेळेचा अक्षम्य विलंब हा ‘रूग्णांना व त्यांचे नातेवाईकांना व लस घेणाऱ्या नागरीकांना मनस्ताप’ देणारा असून, आयसीएमआर आपले निर्णय वेळेत जाहीर का करत नाही असा संतापजनक सवाल काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
देशात, प्रथम लसींचा डोस घेतला त्या वेळी दूसरा डोस २८ दिवसा नंतर घेण्याचे सांगितले गेले मात्र त्याचवेळी इतर देशांत मात्र दोन लसीं मधील अंतर ९० ते १२० दिवसा पर्यंत होते. पुन्हा देशांतर्गत लसींचा तुटवडा जाणवू लागल्यावर मात्र टप्प्या – टप्प्याने वेळ वाढवण्याचे धोरण आयसीएमआर जाहीर करायला लागले.तसेच गेले वर्षभर ‘कोविड ॲंटीबॅाडीज ‘प्लाझ्मा थेरपी’ रूग्णांना देण्यास सुरवात होऊन अनेक रूग्ण बरे झाल्याचेही पहायला मिळाले आहे.विविध सामाजिक संधटना / संस्था पुढे येऊन कोविड होऊन गेलेल्यांचे प्रबोधन करत आहेत व त्यांना प्लाझ्मा दान करणे बाबत ऊद्युक्त करत आहेत.अशा परिस्थितीत अचानक आयसीएमआर ने ‘प्लाझ्मा थेरपी’ गैरलागू बाबत निर्णय जाहीर करणे ही बाब गांभिर्याची – वानवाच दर्शवते असे त्यांनी म्हटले आहे.
कोविड रूग्णास प्लाझ्मा थेरपी’ गैर-लागू ठरणे बाबत काही स्टडीज्, निष्कर्ष आले आहेत काय? ते कधी आले ? या बाबत कोठेच स्पष्टता नाही हे संतापजनक आहे…! इतर देशांच्या तुलनेत प्रचंड विलंबाने प्लाझ्मा थेरपीवरील टेस्ट का होत आहे..? ज्या रूग्णांनी या प्लाझ्मा थेरपीने खर्चिक ऊपचार करून घेतले त्यांना देखील मनस्ताप देणारा निर्णय नाही काय..? या विषयी आयसीएमआर ने स्पष्ट केले पाहीजे तसेच ‘कोणत्या निष्कर्षांचे आधारे’ प्लाझ्मा थेरपी गैर लागू असल्याचे सांगितले? ते वैद्यकीय व वैज्ञानिक दृष्ट्या जाहीर करणे व रूग्ण व त्यांचे नातेवाईकांना स्पष्टता देणे आवश्यक वाटत नाही काय? यामागे मल्टिलेव्हल औषध कंपन्यांची काही भूमिका तर नाही ना असा थेट संशय देखील गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केला..!
भारताने आजतागायत केलेल्या प्रगतिचे आधारेच् ‘जागतिक आरोग्य संघटनेचे’ अध्यक्षपद भारताकडे आले, मात्र आम्हास (भारतास) ‘विश्वगुरू व विश्वदाता’ बनण्याच्या घाई मुळे कोरोना प्रतिबंधक साहीत्य (पीपी कीट, व्हेंटी लेटर्स, मास्क) ते लसीं पर्यंतची खैरात भारत विदेशात करण्यात मग्न आहे. केंद्र सरकारचे आयसीएमआर बरोबर योग्य संपर्क (कम्युनिकेशन) वा ताळमेळ नसल्याचेच* वारंवार दिसून येते….!! या संस्थेकडून देशास मोठ्या अपेक्षा असुन, आयसीएमआर ने या कसोटीस पारदर्शकपणे सामोरे गेले पाहीजे व आपली विश्वासार्हता वाढवली पाहीजे असे परखड मत देखील काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
- अखेर रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
- भाजपा मुंबई महानगरपालिकेविरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
- वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत चिंता ; भारतीय संघासोबत आणखी एक यष्टीरक्षक जाणार इंग्लंडला
- राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे – प्रियांका गांधी