विनोदी असो वा गंभीर भूमिका, सशक्त अभिनयाचा वारसा, मंकरद अनासपुरे!

makrnd anaspure

मुंबई : मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाच्या अंदाजात सर्वांनाच हसवले. त्यांच्या याच अंदाजामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक आपलस स्थान निर्माण केले आहे. मकरंद उत्तम अभिनेता सोबत एक उत्तम समाजसेवक देखील आहे. त्याच्या कार्याचे नेहमीच कौतुक केले जाते. मकरंद अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी…

मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादमधील सरस्वती भुवन कॉलेजमध्ये अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले होते. त्यांनी सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी कॉलेज वयापासूनचं नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर मकरंद यांनी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता.

मात्र कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांना हव्या तशा भूमिका मिळाल्या नाहीत. त्यानंतर हळू हळू त्यांच्या अभिनयानं त्यांनी यश मिळवले. मकरंदने आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना भुरळ घातली आहे. त्यांचे अभिनय आणि त्याची बोलण्याची अनोखी शैली यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

सध्या अभिनेता नाना पाटेकर यांच्या सोबत मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी कार्यरत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र चर्चा असते यामुळे देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या