काळजी घ्या ; राज्यात आज कोरोनामुळे १९५ रुग्णांच्या मृत्यू तर…

corona

मुंबई : राज्यात आज 6126 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज कोरोनामुळे 195 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७२,८१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर एकूण सात जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. तर राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या