काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

lockdown

उस्मानाबाद : तुळजापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मास्क-सॅनिटाझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी करू नका अन्यथा पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल असा इशारा नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिला आहे. तुळजापूरात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत नगरसेवक, व्यावसायिक व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर सर्वांनी शहरातून रॅली काढत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

तुळजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका कार्यालयात आयोजित व्यापारी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत नगराध्यक्ष रोचकरी बोलत होते. बैठकीत व्यावसायिक, पुजारी, सर्वपक्षीय नेत्यांनी लाॅकडाऊनला विरोध करत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याची सुचना पालिकेला केली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही व्यावसायिक, सर्वपक्षीय नेत्यांनी दिली. यावेळी व्यावसायिकांनी मास्कशिवाय भाविक, ग्राहकांना वस्तू न देणे, पुजारी यांनी भाविकांना मास्क बांधण्यास सांगणे आदी निर्णय यावेळी घेण्यात आले. बैठकीला सर्वपक्षीय, संघटनेचे नेत, पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग पाहता नागरिकांनी काळजी न घेतल्यास तुळजापूर शहरात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या