‘खत-बियाण्यांचा तुटवडा भासू नये याची खबरदारी घ्या’, आ.धस यांच्या ‘महाबीज’ला सूचना

बीड : बियाण्यांच्या कमतरतेवरून पेरणीचा काळ लांबल्याचा गोंधळ गेला काही वर्षांपासून पाहण्यास मिळत आहे. याच अनुषंगाने अकोला येथील महाराष्ट्र राज्य महाबीज मंडळ येथे मुख्य व्यवस्थापकांची भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. मराठवाडा विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणीसह सर्व जिल्ह्यांना खत – बियाण्यांचा तुटवडा भासू नये असे पूर्वनियोजन करण्याबाबत आमदार धस यांनी अकोलास्थीत मंडळाच्या कार्यालयात मुख्य व्यवस्थापक फुंडकर यांच्याकडे मागणी केली.

मराठवाड्यातील बीडसह इतर जिल्ह्यात सोयाबीन व इतर लागवडीचे प्रमाण अधिक असणाऱ्या पिकांच्या बियाण्याची कमतरता ही ऐन पेरणीवेळी मोठ्या प्रमाणात जाणवते. बियाणे उपलब्ध न झाल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीचा महत्वाचा असणारा वेळ निघून जातो व शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते.

यासह उन्हाळी सिंचनाची उपलब्धतता असणाऱ्या तालुक्यांमध्ये बियाणे उत्पादनाची क्षेत्रे/सीड प्लॉट द्यावीत जेणेकरून स्थानिक ठिकाणीच बियाणे उपलब्ध होईल व त्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल, अशी मागणी आमदार धस यांनी महाबीजकडे केली. यावेळी महाबीजचे उत्पादक व्यवस्थापक फुंडकर, गुणवत्ता नियंत्रक लहाने, प्रक्रिया व्यवस्थापक पांगरुत आदींसह आमदार धस यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP