सावध व्हा ! पुणे शहरापेक्षा अमरावतीमध्ये आढळले अधिक रुग्ण

amravati

अमरावती : अमरावती मध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या आठवड्याभरासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे.

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे दररोज मोठ्या प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावतीत कोरोनाचा विळखा अतिशय घट्ट झाला आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या समोर आली असून पुणे शहरातील आजच्या दिवसभरातील रुग्णांपेक्षा ही संख्या अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे.

आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 673 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 30 हजार 197 वर पोहोचली आहे. दरम्यान, पुणे शहरात आज दिवसभरात ३२८ रुग्ण आढळले आहेत. तर, ३१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील स्थिती पुण्याहून अधिक गंभीर होत असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या