सावधान! विनाकारण फिरताना वाहन पकडल्यास थकीत दंडही भरावा लागेल

pune polise

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस व वाहतूक पोलिसांकडून रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांच्या वाहनांची तपासणी सुरूये. यातील बेजाबदार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, यावेळी पोलिसांना एक बाब माहिती झालीये. अनेक वाहनांवर अनेक वर्षांपासून थकीत असलेला दंडसुध्दा समोर येत आहे. अशा वाहनचालकांकडून नविन व जुना असे दोन्ही दंड पोलिसांकडून वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणादणलेत.

राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानूसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सकाळी ७ ते ११ या चार तासांव्यतिरिक्त कोणालाही विनाकारण रस्त्यावर फिरता येत नाही. त्यामुळे हा चार तासांचा कालावधी वगळता पोलिसांकडून इतर वेळी रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांची वाहने तपासली जात आहेत.

वाहतूक पोलिसांकडे मागील काही महिन्यांपासून चलान करण्यासाठी चालान मशिन्स आल्या आहेत. या मशिनने वाहन क्रमांक रिड केल्याबरोबर संबंधित वाहनावर महाराष्ट्रात कधी व कुठे दंड झाला आहे, दंड कशासाठी, दंडाची रक्कम किती अशी सविस्तर माहिती क्षणार्धात संबंधित पोलिसांना दिसते.

पोलीस आता कारवाई करत असताना असे अनेक वाहन तपासणीत पुढे येत आहे. दिवसभरात जुने भरणा केलेले चालान या मशिनमध्ये पोलिसांना दिसतात. अशा वाहनचालकांना नवीन दंडासोबतच जुन्या चालानचा दंडसुद्धा आता भरावा लागत आहे. दिवसभरात एकूण कारवाई केलेल्या वाहनांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के वाहनांवर जुन्या चालानचा दंड निघत आहे.

यामध्ये दंड थकीत असलेल्या वाहनांमध्ये दुचाकींच्या तुलनेत चारचाकींचे प्रमाण अधिक असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी वाहन पकडले आणि पूर्वी जर वाहनावर दंड थकीत असेल तर संबंधित वाहनचालकाला जबर आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP