सावधान! दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेटसक्ती

helmate

औरंगाबाद : न्यायालयाच्या फटकारानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात बुधवार दि. ५ पासून दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्ती केले आहे. याबाबत वाहतूक शाखेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता दुचाकी चालवताना दोन्ही स्वारांना हेल्मेट सक्तीचे झाले आहे. सात वर्षाआधी अमितेश कुमार पोलीस आयुक्त असताना शहरात हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती.

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दरवर्षी १० % अपघात कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे त्याची अंबलबजावणी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी हेल्मेटसक्ती करण्यात आहे. यालाच जागून शहरातील वाहतूक पोलिसांनी बुधवार दि. ५ पासून शहरात हेल्मेटसक्ती केली आहे.

कोरोना संसर्गामुळे शहर पोलीस दलाने ठिकठिकाणी नाका बंदी केली आहे. यामुळे आता नागरिकांना पोलिसांच्या करविला सामोरे जावे लागणार आहे. बुधवार पासून होणाऱ्या सक्तीला नागरिक सहयोग करणार का? असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे. सात वर्षांआधी तत्कालीन आयुक्त अमितेश कुमार यांनी सक्ती प्रभावी पणे अमलात आणली होती.

महत्वाच्या बातम्या