सावधान! आर्म्स रेसलिंग स्पर्धेच्या आयोजनकर्त्यावर गुन्हा दाखल

crime

औरंगाबाद : हॉटेल पिकनिक पॉईन्टच्या पाठीमागील पीस व्हॅली येथे विनापरवाना आर्म्स रेसलिंग स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या काझी अब्दुल माजीद अब्दुल समद (३२, रा. बाबर कॉलनी) आणि इब्राहिम खलील खान (४०, रा. हडको कॉर्नर) या दोघांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे.

ही स्पर्धा १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गर्दी जमविणे, तसेच या ठिकाणी असलेल्या जलतरण तलाव उपलब्ध करून दिले. तसेच संसर्ग जन्य रोग झाला आहे किंवा नाही.

कोव्हीडची तपासणी न करता, सदर आयोजन करण्यात आले असून यात सामाजिक अंतराच्या नियमांचेही उल्लघंन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार वाळुंज हे करित आहे.

महत्वाच्या बातम्या