जाणून घ्या! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय

cm fadanvis meeting

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (बुधवार ) महत्वाचे निर्णय घेण्यात आले. वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय?

  • मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय.
  • वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन होणार.
  • महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम-२०१५ मध्ये सुधारणा.
  • महर्षी वेदोध्दारक फाऊंडेशन आणि महर्षी वेदिक हेल्थ प्रा.लि. यांच्या एकात्मिक अतिविशाल प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता.
  • महाराष्ट्र औद्योगिक धोरण-२०१३ अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीच्या धोरणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मान्यता.
  • एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात सवलती देण्यात येणार.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटाची नामांकित निर्मिती संस्थेकडून निर्मिती करण्याचा निर्णय.
  • राज्यातील मंजूर योजनांच्या क्षेत्रात एकात्मिकृत नगरवसाहत प्रकल्प विकसित करण्यासाठी मंजूर विनियमामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

cm fadanvis

movie on mahatma fule

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...