पंतग जरा जपून उडवा- महावितरण

नागपूर – संक्रांतीच्या सणाला पतंग उडवताना नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच वीज वाहिन्या, खांब यावर अडकलेल्या परंगीच्या मोहात जीव धोक्यात घालू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका तारेवर दुस-या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची, प्रसंगी प्राणांकीत अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो.

सद्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्री करिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणांकीत अपघाताची दाट शक्यता आहे.

गेल्या वर्षी नागपुरातील सदभावना नगर इथल्या देवांशू विजय अहेर या ९ वर्षीय बालकाचा मृत्यू पतंग उडवितांना मिरे लेआऊट येथील घराच्या गच्चीजवळील उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्शाने झाला होता, तर दुस-या एक घटनेत खामला झोपडपट्टीतील राजेश पुरण पटेल या १८ वर्षीय तरूणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढ़ण्याच्या नादात मृत्यू झाला होता, या व अश्या घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतात, अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...