सोशल मीडियावर आक्रमक राहा; राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत सोशल सल्ला

ncp

टीम महाराष्ट्र देशा – पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी व कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या चिंतन बैठकीचा कार्यक्रम कर्जत येथे चालू आहे. या चिंतन बैठकीला पक्षांचे सर्वच वरिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी सोशल मीडियावर जास्ती लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा फारसा वापर केला जात नाही अशी चिंता व्यक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपाला तोंड देयायच असेल तर सोशल मिडियाचा जास्ती वापर करण्याचा मंत्र देखील या चिंतन बैठकीत देण्यात आला आहे.

पक्षांला पुन्हा बळ देण्यासाठी विविध विषयांवर चर्चासत्र ठेवण्यात आले आहेत. सोशल मीडियासाठी आज सकाळचा वेळ राखून ठेवण्यात आला होता. सोशल मीडियाच्या वापरात आपण अधिक आक्रमकता ठेवली पाहिजे, असं मत व्यक्त करण्यात आलं. आमदार, खासदार, नेते, जिल्हाध्यक्ष यांना पक्षाच्या पोस्ट आणि ट्विट शेअर रिट्विट करा, असं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे या बैठकीत सोशल मिडीयावर जास्ती चिंतन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल हे येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...