fbpx

बच्चू कडू आणि आदित्य ठाकरेंची भेट, येत्या निवडणुकीत एकत्र दिसण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय सूत्र हालताना दिसत आहेत. तर या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू शिवसेने सोबत जाणार असल्याचं दिसत आहे. कारण शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मंगळवारी शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतली. या भेटी नंतर राजकीय वर्तुळात बच्चू कडू आणि शिवसेना यांच्या भेटी बाबत चर्चा होऊ लागली.

याबाबत भेटी बाबत बच्चू कडू म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात मी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही अशाप्रकारच्या युतीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सध्या विधानसभेत प्रहार संघटनेचा केवळ एक आमदार आहे. यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी ताकदीने मांडता येतील.

मंत्रालयातील दालनात मंगळवारी बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत बच्चू कडू यांनी शिवसेना-भाजपशी युती करावी, अशी चर्चा झाली. यावर बच्चू कडूंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर भाजप आणि शिवसेनेने दिलेल्या ऑफरवर विचार करणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिल आहेत. त्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे. याचा फायदा निवडणुकीत शिवसेना-भाजपला होऊ शकतो.