Share

Women Cricket | महिला क्रिकेट खेळाडूंसाठी BCCI ने घेतला ऐतिहासिक निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: टी20 विश्व कप T20 World Cup दरम्यान बीसीसीआय BCCI ने महिला क्रिकेट खेळाडूंना Women Cricket खुशखबर दिली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट खेळाडूंप्रमाणे आता भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनाही मानधन मिळणार आहे. आतापर्यंत पुरुषांना महिलांपेक्षा जास्त मानधन मिळत होते पण मात्र आत्ता जाहीर झालेल्या निर्णयानुसार पुरुषांना आणि महिलांना समान मानधन मिळणार असून बीसीसीआयने हे अंतर कमी केले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण आता लैंगिक समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. दरम्यान पुरुष आणि महिलांना समान अधिकार दिले जातात तर यापुढे महिला आणि पुरुष खेळाडूंना समान मानधन दिले जाईल.

पुरुष क्रिकेट खेळाडूंप्रमाणे महिला क्रिकेट खेळाडूंना मिळणार मानधन

भारतीय पुरुष क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये मानधन दिले जाते. तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी पुरुषांना प्रत्येकी 6 लाख रुपये दिले जातात. तर, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी पुरुष खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जाते. महिला क्रिकेट खेळाडूंना आधी यापेक्षा कमी मानधन दिले जायचे. पण बीसीसीआय ने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता महिलांना सुद्धा पुरुष खेळाडू प्रमाणे प्रत्येकी एवढे मानधन दिले जाईल.

आत्तापर्यंत महिला क्रिकेट खेळाडूंना Women Cricket Player  मिळणारे मानधन

यापूर्वी महिला क्रिकेट खेळाडूंना प्रतिदिन सुमारे 20,000 रुपये प्रत्येकी मॅच मानधन दिले जात होते. या मानधनाची रक्कम भारतीय पुरुष संघाच्या 19 वर्षाखालील खेळाडूंच्या बरोबरीची होती. पण आता हे अंतर संपलेले असून महिला क्रिकेट खेळाडूंना देखील पुरुष क्रिकेट खेळाडूंनी एवढीच मानधन दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: टी20 विश्व कप T20 World Cup दरम्यान बीसीसीआय BCCI ने महिला क्रिकेट खेळाडूंना Women Cricket खुशखबर दिली …

पुढे वाचा

Cricket Sports