कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

virat

मुंबई : आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरु होती. कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याच्या जोरादार चर्चा रंगल्या होत्या. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होणार असल्याचं देखील बोललं जात होत.

याच चर्चांवर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिकेटविश्वास रंगत असलेल्या सगळ्या चर्चा खोट्या असून असं काहीही केलं जाणार नाही. विराटच्या कॅप्टन्सीवर बीसीसीआयची कोणतीही बैठक वा चर्चा झालेली नाही. विराटच सगळ्या फॉरमॅटसाठीचा कॅप्टन असेल, असं बीसीसीआयचे खजीनदार अरूण धुमाळ यांनी सांगितलं होत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराटचा जास्त फॉर्म दिसला नाही. तसेच विराट त्याच्या कॅप्टन्सीमुळे चांगला खेळ दर्शवत नसल्याचे देखील म्हणले जात होते. यावरच बीसीसीआयने स्पष्टीकरण देत संघाचं कर्णधार विराट कोहलीच असणार  असल्याचं स्पष्ट केलं होत.

या चर्चांवर आता BCCI चे सचिव जय शाह यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. जय शहा यांनी कोहलीच्या कर्णधार पदावर होणाऱ्या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या बातम्या निराधार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या