दादाचा दणका : ‘या’ खेळाडूवर आता तीन वर्षांची बंदी

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या एका खेळाडूने निंदनीय कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर बीसीसीआयने तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक क्षेत्रात अमुलाग्र बदल केले जात आहेत. दादा आता आपल्या कठोर स्वभावामुळे चर्चेत आहे.

नूतन अध्यक्षांनी खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा जपण्यासाठी काही पावले उचलली आहेत. भारताच्या एका खेळाडूने वयचोरी करण्याचा गुन्हा केला आहे. हा खेळाडू आपला जन्म १२ डिसेंबर २००१ या दिवशी झाल्याचे सांगत होता. त्यामुसार तो १९ वर्षांखालील संघात खेळत होता. पण त्याच्या शाळेतील दाखल्यामध्ये १० जून १९९६ ही जन्मतारीख दाखवत आहे .

या खेळाडूचे नाव प्रिन्स राम निवास यादव, असे आहे. वयचोरी केलेल्या या खेळाडूवर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हा खेळाडू दिल्लीच्या संघातून खेळत होता. त्याचबरोबर या खेळाडूने दहावीची परीक्षाही पास केलेली असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...