आयपीएल सुरु व्हायला काही तासचं बाकी, याआधीच BCCI ची सरकारकडं खास मागणी

आयपीएल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सिझन शुक्रवारी सुरु होत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यंदा आयपीएलच्या स्पर्धा  6 ठिकाण खेळवण्यात येत आहेत. परंतु या स्पर्धा प्रेक्षकविना खेळवल्या  जाणार आहेत. तसेच खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये वाढ करण्यात आली आहे,

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयनं सरकारकडं खास मागणी केली आहे. यामध्ये विमान तळावर वेगळा चेक-इन काऊंटर तयार करण्याची मागणी केली आहे. यंदा आयपीएल सहा शहरांमध्ये होणार आहेत. एका ठिकाणीवरुन दुसरिकडं जाण्यासाठी विमान प्रवास आवश्यक आहे. विमानतळावर खेळाडू आणि आयपीएलशी संबंधित अन्य मंडळी व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक टीम बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर तीन वेळा विमान प्रवास करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं वेगळ्या ‘चेक इन काऊंटर’ ची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या