बीसीसीआयने संघ व्यवस्थापनात केले मोठे बदल, महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ चा वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बीसीसीआय सध्या संघात आणि संघव्यवस्थापनामध्ये बदलाच्या तयारीत आहे. त्यामुळे बीसीसीआयने महत्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, तंदुरुस्ती प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३० जुलै २०१९, सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत. सध्याच्या व्यवस्थापन समितीचा करार हा वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत होता. परंतु नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सध्याच्या समितीचा कालावधी वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक, भरत अरूण गोलंदाजी प्रशिक्षक, संजय बांगर फलंदाजी प्रशिक्षक व आर. श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अशी समिती आहे. यांच्या जागी नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती होऊ शकते तर काही प्रशिक्षकांची फेरनिवड होऊ शकते