क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करा,बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या प्रमुखांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- मॅच फिक्सिंगच्या मुद्द्यावरून नेहमी मोठे वाद निर्माण होत असतात. भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची मोठी समस्या असल्याचे वारंवार समोर आलं आहे. दरम्यान याच समस्येला दूर करण्यासाठी आता मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत, तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी अशी मागणी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी केली आहे .

दरम्यान, या निर्णयामुळे सरकारचा मोठा फायदा होईल, असं देखील शेखावत यांनी मत व्यक्त केलं आहे. शेखावत यांनी मॅच फिक्सिंगसंबंधी नियम आणि क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केली आहे. मॅच फिक्सिंगसंबंधी नियम करण्याची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट करून सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी अशी मागणी समोर येत आहे. आता बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या प्रमुखानीच हि मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.