‘प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वसईत राष्ट्रवादी महिला पक्षाचे जोडे मारो आंदोलन’

पुणे: विरोधी पक्षाचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यावरून वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अश्विनी गुरव यांच्या नेतृत्वात दरेकर यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आंदोलन केल्याचे अश्विनी गुरव यांनी म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. यावरूनच राष्ट्रवादीने त्यांच्यावर पलटवार करत सडेतोड उत्तर दिले होते.

दरेकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी’ असा इशारा दिला होता. तर आज वसई येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या