हुकूमशाही सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू : आ. बसवराज पाटील

औसा : तत्त्वांनी आणि विचारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जोडली गेली असल्याने हे दोन्ही पक्ष म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत सर्व घटक पक्षांनी एकत्र येत जुलमी आणि हुकूमशाही युती सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू. शरद पवारांसारख्या माणसावर गुन्हे दाखल करून या सरकारने त्यांची नैतिकता दाखविली आहे. इंदिरा गांधींपासून शरद पवारांपर्यंत एक स्वच्छ राजकीय वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आघाडीचे सरकार येण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, रशीद शेख, माजी उपनगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, अविनाश टिके, तर कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, शिरीष उटगे, बसवराज धाराशिवे, हणमंत राचट्टे आणि दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी गोविंद जाधव आणि स्वच्छता सभापती मेहराज शेख यांच्या घरी भेट दिली.

Loading...

एकीकडे उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेना युतीत अस्वस्थता पसरली असताना आघाडीचे उमेदवार बसवराज पाटलांच्या विजयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तळागळातील कार्यकर्ता कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जिवाचे रान करेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार बसवराज पाटील यांना दिला आहे. यावेळी आमदार पाटील म्हणाले, की केंद्रात आणि राज्यात वेगळ्या विचारांचे सरकार आले आहे. यांना लोकांच्या हिताचे काहीच देणे-घेणे नाही. लोकांना भावनिक साद घालत व जातिधर्मात भांडणे लावून एकमेकांविरोधात उभे केले जात आहे.

त्यामुळे सावध राहून आपले कार्य केले पाहिजे. काहीही करून सत्ता हस्तगत करू पाहणाऱ्या या मंडळींना आता सत्तेपासून रोखले, तरच देशाचे आणि राज्याचे भले होणार आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आघाडीच्या उमेदवारांसाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमदार पाटील यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतल्याचे दत्तात्रय कोळपे आणि रशीद शेख यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण